१६/०४/२०२० च्या चालू घडामोडी

१६/०४/२०२० च्या चालू घडामोडी

पहिला जागतिक चगास रोग दिन-

 1. 14 एप्रिल
 2. १५ एप्रिल
 3. १३ एपिल
 4. १६ एप्रिल

पहिला “जागतिक चगास रोग दिन”: 14 एप्रिल 2020

🔰 जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) नेतृत्वात जागतिक समुदायाने 14 एप्रिल 2020 रोजी पहिला ‘जागतिक चगास रोग दिन’ पाळला. चगास रोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि रोगाला आळा घालण्यासाठी आवश्यक संसाधने वाढविणे हा या दिनाचा हेतू आहे.

चगास रोगाबद्दल

🔰 सक्रमित रक्त-शोषक ट्रायटोमाइन किड्याच्या मल-मूत्राच्या संपर्कात आल्यामुळे त्यातले ‘टी. क्रूझी’ परजीवी शरीरात प्रवेश करतात. ट्रायटोमाइन किडे सामान्यत: भिंतीतल्या किंवा छताच्या भेगांमध्ये राहतात आणि त्यांची संख्या ग्रामीण किंवा उपनगर भागात असलेल्या कमकुवत घरांमध्ये अधिक दिसून येते.

🔰 सर्वसाधारणपणे ते दिवसा लपून असतात आणि रात्री सक्रिय होतात. ते मानवी रक्तावर जीविका करतात.

🔰 1909 साली ब्राझीलमध्ये पहिला रुग्ण आढळला होता. त्यावेळी डॉ. कार्लोस रिबेरो जस्टिनिओ चगास यांनी या आजाराचे निदान केले होते.

🔸इतर ठळक बाबी

🔰 ा एक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग आहे.

🔰 परारंभी हा रोग केवळ लॅटिन अमेरिका उपखंडाच्या देशांमध्येच आढळत होता, ज्यामुळे रोगाला ‘अमेरिकन ट्रायपेनोसोमियासिस’ या नावाने देखील ओळखले जाते. मात्र आज हा रोग जगातल्या इतर देशांमध्ये देखील दिसून येतो, ज्यामुळे ती एक जागतिक आरोग्य समस्या बनली आहे.

🔰 चगास रोगामुळे लॅटिन अमेरिकेतल्या सहा ते सात दशलक्ष लोक ग्रसीत होते. मुख्यतः दरिद्री लोकांमध्ये हा रोग आढळून आला होता.

🔰 गल्या काही दशकांमध्ये, अमेरिका देश आणि कॅनडा आणि बर्‍याच युरोपिय आणि काही पश्चिम प्रशांत देशांमध्ये या रोगाचे रुग्ण वाढत्या प्रमाणात आढळून आले आहे.

 • भारतीय भुदलाने ‘ऑपरेशन मेघदूत’ या मोहिमेदरम्यान दाखविलेल्या धाडसाचा सन्मान करण्यासाठी ———– रोजी 36 वा सियाचीन दिन साजरा केला.
 • १३ एप्रिल २०२०
 • १२ एप्रिल २०२०
 • 14 एप्रिल २०२०
 • १५ एप्रिल २०२०
 • सियाचीन हिमप्रदेशावर नियंत्रण मिळवण्यासाठी चलविलेले ‘ऑपरेशन मेघदूत’ – 13 एप्रिल 1984.
 • समुद्रसपाटीपासून 6000 मीटर उंचीवरचे जगातली सर्वात उंच युद्धभूमी – सियाचीन (भारताच्या उत्तर-पश्चिम भागात काराकोरम पर्वतरांगेत).
 • हा देश भारताला 1515 दशलक्ष डॉलर किंमतीचे हार्पून ब्लॉक II क्षेपणास्त्र आणि टॉर्पेडो विकणार
 • अमेरिका
 • रशिया
 • जपान
 • चीन

उपकाराची परतफेड? अमेरिका भारताला देणार घातक हारपून मिसाइल आणि टॉरपीडोस

ट्रम्प प्रशासनाने सोमवारी अमेरिकन काँग्रेसला भारताला हारपून ब्लॉक दोन एअर मिसाइल आणि टॉरपीडोसची विक्री करणार असल्याच्या निर्णयाची माहिती दिली. हा एकूण व्यवहार १५ कोटी ५० लाख अमेरिकन डॉलर्सचा आहे. भारत अमेरिकेकडून दहा एजीएम-८४एल हारपून ब्लॉक दोन एअर मिसाइल विकत घेणार आहे. हा व्यवहार अंदाजे ९ कोटी २० लाख अमेरिकन डॉलर्सचा आहे. टॉरपीडोसच्या व्यवहारामध्ये भारताला अंदाजे ६ कोटी ३० लाख डॉलर्स मोजावे लागतील.

डिफेन्स सिक्युरिटी कोऑपरेशन एजन्सीने दोन वेगवेगळया अधिसूचना काढून काँग्रेसला ही माहिती दिली. हारपून मिसाइल सिस्टिम P-8I विमानामध्ये बसवली जाते. भारताने आपल्या नौदलासाठी ही विमाने अमेरिकेकडून आधीच विकत घेतली आहेत. सध्या टेहळणीसाठी या विमानांचा वापर सुरु आहे. P-8I विमानामधून पाणबुडीवर अत्यंत अचूकतेने हल्ला केला जाऊ शकतो.

आहे तर टॉरपीडोसचा रेथीऑन कंपनीकडून पुरवठा केला जाणार आहे. मागच्या आठवडयात भारताने अमेरिकेला HCQ या गोळयांचा पुरवठा केला. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टि्वट करुन पंतप्रधानांचे आभार मानले व हे उपकार कधी विसरणार नाही असे म्हटले होते. त्यानंतर आता ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन काँग्रेसला भारताला मिसाइल, टॉरपीडोस विकणार असल्याच्या निर्णयाची माहिती दिली.

🎇 भारताचे माजी अ‍ॅटर्नी जनरल अशोक देसाई यांचं निधन 🎇

 • सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आणि भारताचे माजी अ‍ॅटर्नी जनरल अशोक देसाई यांचं निधन झालं आहे. सोमवारी सकाळी साडे
 • पाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७७ वर्षांचे होते.
 •  पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आल होतं. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेकांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. अशोक देसाई यांनी १९५६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयातून वकिलीला सुरुवात केली होती.
 •  ८ ऑगस्ट १९७७ रोजी वरिष्ठ वकील म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ९ जुलै १९९६ ते ६ मे १९९८ पर्यंत ते भारताचे अ‍ॅटर्नी जनरल होते. २००१ मध्ये त्यांचा पद्मविभूषण तसंच लॉ ल्युमिनेरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
 •  अशोक देसाई १९६४ मध्ये लॉ कॉलेज बॉम्बे येथे प्रोफेसर होते. तसंच १९६७ ते १९७२ दरम्यान बॉम्बे कॉलेज ऑप जर्नलिझम येथे ते लेक्चरर म्हणून काम करत होते. त्यांनी अनेक पुस्तकंदेखील लिहिली आहेत. तसंच त्यांचे अनेक लेखही प्रसिद्ध झाले आहेत.

ऋषिकेशच्या AIIMS संस्थेनी भारतातली पहिली ‘दूरस्थ आरोग्य संनियंत्रण प्रणाली’ विकसित केली

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BHEL) या सरकारी कंपनीच्या सहकार्याने ऋषिकेशच्या अखिल भारतीय वैद्यकीय शास्त्र संस्थेनी (AIIMS) भारतातली पहिली ‘दूरस्थ आरोग्य संनियंत्रण प्रणाली’ विकसित केली आहे. या प्रणालीसाठी एक संकेतस्थळ आणि मोबाईल अॅप्लिकेशन देखील तयार करण्यात आले आहे.

या सुविधेमुळे रुग्णाच्या शरीराचे तापमान आणि इतर बाबी प्रत्यक्षात उपस्थित नसताना चिकित्सक आपल्या ठिकाणीच मिळवू शकतील, ज्यामुळे आजारांचा संसर्ग टाळता येणार.

कोविड-19 रूग्णांच्या उपचारासाठी उत्तराखंडमध्ये या प्रणालीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याची योजना आहे. राज्यात कोविड-19 रूग्णांचा शोध घेण्यासाठी देखील राज्यातली यंत्रणा ‘दूरस्थ आरोग्य संनियंत्रण प्रणाली’चा वापर करणार आहे. एखाद्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्यास प्रणाली तसा इशारा देखील देणार.

मुंबईत प्लाझ्मा थेरिपी सुरुं करायची पलिकची  तयारी

    ही थेरी अभ्यास अंतर्गत असल्याने ICMR (इंडियन मेडिकलकोन्सिल ऑफ इंडिया) अणि केंद्रीय औषध नियत्रण विभाग यांच्या अंबल बजवानी साठी परवानगी मागितली आहे –

        थेरिपी नेमकी काय आहे ?

                कोरोना संसर्गातुं मुक्त होऊन 14 दिवसावून अधिक कालावधि झालेल्या व्यक्यतिचे रक्त या थेरिपी साठी वापर्न्यर येते शक्यतो तरुन व्यक्तीच्या शरीरातून हे रक्त घेतले जाईल.

        प्रकिया कशी ?

कोरोना संसर्गातुं मुक्त झालेल्या  रुग्नाच्या रोग संक्रमानस विरोध करणारी प्रतिद्रवे संश्लेषित करतात. अशा रुग्नाच्या रक्तातील फिकट पिवाल्सर रंगाचा पल्ज्मा वेगळा केला जातो. हा पल्ज्मा कोरोनाच्या संसर्गाने गंभीर प्रतिकृति झालेल्या रुग्नस चाढविल्यास प्रभाव कमी वोंयाची शक्यता जाणवते.यालाच प्लाज्मा थेरेपी म्हणतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *