देशातील सर्वात मोठे करोना रुग्णालय ‘या’ राज्यात उभारणार

देशातील सर्वात मोठे करोना रुग्णालय ‘या’ राज्यात उभारणार

🔰जगभरात धुमाकुळ घालणाऱ्या करोना व्हायरसचा धोका देशात दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ओदिशा सरकार देशातील सर्वात मोठं ‘COVID-19 ट्रिटमेंट’ रुग्णालय उभारणार आहे. या भव्य रुग्णालयात तब्बल एक हजार खाटांची व्यवस्था असणार आहे.

🔰ओदिशा सरकार, कार्पोरेट्स व वैद्यकीय महाविद्यालयांच्या समन्वयातून एक हजार खाटांची व्यवस्था असणारे हे देशातील पहिले भव्य असे ‘COVID-19 ट्रिटमेंट’ रुग्णालय उभारले जात आहे. यासाठी एका त्रिपक्षीय सामंजस्य करारावर आज स्वाक्षरी देखील करण्यात आली आहे.

🔰ओदिशा सरकार या रुग्णालयाच्या निर्मितीसाठी तयारीला लागले आहे. ओदिशा देशातील पहिले राज्य ठरणार आहे. ज्या ठिकाणी COVID-19 च्या रुग्णांसाठी एवढे मोठे रुग्णालय उभारले जात आहे.

🔰 विशेष म्हणजे ओदिशा राज्यात आतापर्यंत करोनाचे केवळ दोन रुग्ण आढळलेले आहेत. रुग्णालय ओदिशात नेमके कुठं उभारले जाणार हे अद्यापर्यंत स्पष्ट झालेले नाही.

🔰 दुसरीकडे आसाम सरकारने देखीळ करोना व्हायरसच्या संकटाला तोंड देण्यासाठी गुवाहाटीमधील इंदिरा गांधी स्टेडियमवर आयसोलेशन सेंटरची निर्मिती करण्यास सुरुवात केलेली आहे. आसाममध्ये आतापर्यंत करोनाची बाधा झालेला एकहीजण आढळलेला नाही.

🔰 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केलं आहे. २१ दिवसांच्या या लॉकडाउनमधील आज (गुरुवार) दुसरा दिवस आहे. हा लॉकडाउन १४ एप्रिलपर्यंत सुरु असणार आहे.

🔰 तर दुसरीकडे जगभऱातील करोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस वाढतानाचे चित्र दिसत आहे. जगभरामध्ये करोनाग्रस्तांची संख्या ४ लाख ६० हजारहून अधिक झाली आहे.

🔰 देशातील करोनाग्रस्तांची संख्या ६४९ असून मागील २४ तासांमध्ये ४२ नवीन प्रकरणे समोर आली आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्र्यालयाचे जॉइन्ट सेक्रेट्री लव अग्रवाल यांनी दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *